sign
home
xdfgx
fgy
gyf dgr
fdyd

 

 

Artist Diary
शोध

सगळीकड़े  शांतता असते. निरव शांतता, झाडे, पाने, पक्षी, प्राणी, सगळे शांत .
वारा मात्र वाहत असतो तोहि अगदी शांत. अगदी कुणाला  न हिणवता न  खुणावता वाहत असतो. निरंतर आणि मध्येच वाऱ्याची एक हलकीशी झुळुक येते. वाऱ्याची झुळुकही बघाना झाडावरच्या दोन ते तीनच पानांना खूप जोरजोरात हलवते. कशी अल्लड, बालिश, जिथे मिळेल तशी वाट करून सापा सारखी पळत राहते मध्येच काही पानांना हलवून जागे करते. बाकीची पानंही हलतात. पण हलण्याचा उत्स्फूर्तपणा त्यांच्यात दिसत नाही.

 

ही हवेची लाट अशीच सर्वांच्या आयुष्यात एकदाना एकदा नक्कीच येते आणि संपूर्ण आयुष्य दही घोटल्याप्रमाणे घुसमटून टाकते. केवढ सामर्थ्य असेल त्या लाटेत. कुठल पान उचलेल आणि कोठे नेऊन टाकेल. आपलीही अशीच पाने कोठे कोठे नेऊन टाकते. आपणाला कळतही नाही नव्हे काही कळण्याच्या आतच सारं घडलेलं असते आणि सार जीवन अस्ताव्यस्त पडलेल मिळते. ते सापडणे त्यापेक्षा ते शोधणे खूप गरजेच असते.

आपण काय शोधतोय हे आपणाला माहिती असल्यावर आपण शोधायच तरी काय? कुठल्या एका ठराविक गोष्टीचा आपण शोध घ्यायचे ठरवले तर नक्कीच त्या गोष्टीविषयी आपणाला काही तरी ज्ञात असते आणि ज्ञात असलेल्या गोष्टीचा शोध कसा घेणार? म्हणून शोध ही संकल्पना मला पूर्णता अमूर्त वाटते. आपण एखाद कार्य करत असताना आपणाला जे जे नवीन मिळत जाते ते तेथे तेथे मिळालेल्या गोष्टीचा शोध लागतो आणि तिथेच त्यागोष्टीची अमुर्तावस्था संपून जाते आणि पुन्हा त्याठिकाणाहून शोध सुरू होतो. अखंड, निरंतर.............

' शोधा म्हणजे सापडेल', असे कोणीतरी लिहून ठेवलेय. पण काय शोधावं हे कळणंही तितकच गरजेचं आहे. शोधणे म्हणजे नक्की काय? काहीतरी शोधा म्हणजे काहीतरी मिळेल. ह्या अजब दुनियेत प्रत्येकजन प्रत्येकवेळी काहीनाकाही शोधत असतो. एका ठिकाणी नजर रोखून मी केंद्र शोधतो, एका ठिकाणी बोट ठेऊनमी जागा शोधतो, हे जग न्याहाळतो, प्रत्येक रेषेचा, प्रत्येक आकाराचा, प्रत्येक सिमेचा, दर मैलाचा,पानांच्या कुजबुजण्याचा, हवेच्या झोताचा, कवीच्या मनाचा मी शोध घेतोय.

 

Next..
Website Maintained By :- Finggu Infotech