sign
home
xdfgx
fgy
gyf dgr
fdyd

 

 

 
img1
उमेश रामचंद्र पाटील
जन्म २३ जानेवारी  १९८१ देवघर तालुका वाडा, जिल्हा ठाणे, महाराष्ट्.

चिञ म्हणजे नक्की काय? हा प्रश्न पडण्यासही किती वेळ लागला. त्यावरून चिञ म्हणजे नक्की काय हे समजणे किती कठीण आहे हे समजते. शालेय जीवनात असतानाही इतर विषयांबरोबर चिञकला आवडीचा विषय. पण ह्या चिञांचे स्वरुप त्याची व्याप्ती, त्यातील जाण ही एवढी खोलवर असेल असे कधी वाटलेच नाही. लहानपणी छायाचिञांवर चौकट आखुन त्यावरून काढलेले चिञ पाहून अगदी आंनदात 'मला चिञ काढता येते' असं म्हणायचो. पण हिच चौकट नव्हे अश्या असंख्य चौकटी तोङून चिञ किती उत्स्फुर्तपणे जगता येते. याचा प्रत्यय अगदी आता आता येऊ लागलाय. चिञाला असलेली अध्यात्मीक, तात्वीक, जोड आपणास जीवन किती खोल आहे हे चिञातून जगायला शिकवतात.

 

 

जेव्हा निसर्ग वस्तू चिञणाचा अभ्यास करतानाही सर म्हणायचे फळाच्या बाह्याकारा बरोबर त्याचा आंतराकार पाहत जा. त्याच्या आत पाहणे म्हणजे काय? हे त्यावेळेस न उलगडलेले कोडे आजपर्यत कोडेच बनून राहीले आहे. आणि त्यातूनच मला अमुर्त चिञकलेबद्दलची असलेली ओढ वाढत राहीली. मूर्त म्हणजे काय ? अमुर्त म्हणजे काय ? मुर्त म्हणजे अस्तीत्वात असलेले आणि अमुर्त म्हणजे अस्तीत्वात नसलेले असा ढोबळ अर्थ घेतला तर अमूर्त पेँटीँगमध्ये आकार कुठून येतात. या ना अश्या अनेक प्रश्नांच्या सरबत्तीतून मी अमुर्त कलेकडे झुकला गेलो. आणि नविन आकारांच्या शोधात पेन्टीँगचा प्रवास चालु आहे.

 

Website Maintained By :- Finggu Infotech